मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेण्याची परवानगी : राज्य शासन

13 Jul 2018 15:28:15

 
नागपूर : मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्य पदार्थ नेण्याची परवानगी आहे, असे करण्यास जर कोणी थांबविले तर त्याविरोधात कारवाई करण्यात येईल. यासाठी सरकारकडबन कुठलीही बंदी घालण्यात आलेली नाही. अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत दिली.
 

 
 
 
मल्टिप्लेक्स येथे बाहेरचे खाद्य पदार्थ नेण्याची परवानगी नसते तसेच अधिक दरात खाद्य पदार्थ विकण्यात येतात, या विरोधात विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी हा निर्णय दिला आहे.
 
वेगवेगळ्या ठिकाणांवर वस्तुंच्या किंमती वेगवेगळ्या असणे योग्य नाही, त्यासाठी १ ऑगस्ट पासून एका वस्तुची किंमत प्रत्येक ठिकाणी सारखीच निश्चित करण्यात येईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0