बाईकरेसर चेतना पंडितची गळफास लावून आत्महत्या

11 Jul 2018 22:35:04



मुंबई: महिलांना मोटरसायकल चालवण्याचे प्रशिक्षण देणार्या २७ वर्षीय चेतना पंडित या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, प्रेमभंग झाल्याने चेतनाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. चेतनाच्या घरात सुसाइड नोट सापडली असून, याप्रकरणाची दिंडोशी पोलीस चौकशी करत आहेत. गोरेगावमधल्या पदमावती नगरमधील इमारतीत चेतना आपल्या चार मैत्रिणींसोबत राहायची. सोमवारी संध्याकाळी घरात कोणी नसताना गळफास लावून तिने आत्महत्या केली. चेतनाच्या मैत्रिणी घरी परतल्यानंतर बराचवेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी दुसर्या चावीने दरवाजा उघडला. त्यावेळेस हा सर्व प्रकार उघडकीस आला. ‘माझ्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे.’ असे तिने सुसाइड नोटमध्ये नमूद केले. चेतनाच्या मागे तिचा एकुलता एक भाऊ असून सुसाइड नोटमध्ये तिने भावाची माफी मागितली.

Powered By Sangraha 9.0