फिफा विश्वचषक : फ्रांसची अंतिम फेरीत धडक

11 Jul 2018 11:15:55
 
 
 
 
 
रशिया : फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रांसने धडक मारली आहे. बेल्जियमला १-० अशा केवळ एका फरकाने मागे टाकत फ्रांसने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले आहे. तब्बल १२ वर्षांनंतर फ्रांसने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे आता फिफा विश्वचषक स्पर्धेची यावर्षीची अंतिम फेरी फ्रांस खेळणार आहे. 
 
 
 
 
 
फ्रांस विरुद्ध कुठला देश आता ही अंतिम फेरी खेळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी क्रोएशिया आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो संघ आता फ्रांससोबत अंतिम सामन्यात खेळणार आहे. आता यावर्षीचा फिफा विश्वचषक सामना फ्रांस इंग्लंड विरुद्ध खेळतो की क्रोएशिया विरुद्ध खेळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
 
 
 
 
फ्रांसने अंतिम सामना जिंकला तर फ्रांस १९९८ नंतर आता २०१८ मध्ये फिफा विश्वचषक जिंकेल. २००६ मध्ये फ्रांस अंतिम फेरीत आला होता मात्र इटलीसोबत त्याला अपयश पत्करावे लागले होते. आता फ्रांसने फिफा विश्वचषक २०१८ जिंकला तर त्यांच्या संघासाठी ही अतिशय आनंदाची बाब ठरेल. 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0