विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल
प्रथम बॅचचा निकाल १०० टक्के
करुणा झलारे पहिली, मैथिली छल्लानी व्दितीय
८ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण
सर्व विद्यार्थी उत्तीर्ण
जळगाव, ८ जून :
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमधील इ.१० वी च्या प्रथम बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये घवघवीत यश संपादित केले. विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.
प्रथम करुणा नंदकिशोर झलारे (९६.२० टक्के ), व्दितीय मैथिली महेंद्र छल्लानी( ९६ ), तृतीय मुस्कान राकेश जैन (९३.८०), तसेच कोमल बाबूलाल पाटील (९३.६०), निरज संतोष थेरोकर(९३) करुणा झलारे व मैथिली छल्लानी यांनी गणित या विषयात सर्वाधिक १०० गुण तसेच संस्कृत व विज्ञान या विषयात ९८ गुण प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, सचिव राजेंद्र नन्नवरे, कोषाध्यक्षा हेमाताई अमळकर, शालेय समिती अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे तसेच प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, समन्वयक गणेश लोखंडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
गुणवार तपशील असा
८ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण, २१ विद्यार्थ्यांना ८०% पेक्षा जास्त , ९ विद्यार्थ्यांना ७०% पेक्षा जास्त, ३ विद्यार्थ्यांना ६०% पेक्षा जास्त आणि १ विद्यार्थ्यांला ५०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.