शांताराम नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन

09 Jun 2018 14:44:48
 
 
 
 
 
गोवा : राज्यसभेचे माजी खासदार व गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे माजी अध्यक्ष शांताराम नाईक यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज पहाटे ७ वाजता त्यांचे निधन झाले ते ७२ वर्षांचे होते. शांताराम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना मडगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र तेथे त्यांना वैद्यांकडून मृत घोषित करण्यात आले. 
 
 
 
 
 
यावर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दुख: व्यक्त केले आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपले दुख: व्यक्त केले आहे. काँग्रेसचे प्रामाणिक नेता म्हणून त्यांची ओळख होती. तरुण मुलांसाठी त्यांनी बरेच चांगले कार्य केले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठे नुकसान झाले आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे नेते गिरीश राय चोदानकर यांनी व्यक्त केली आहे. 
 
 
 
 
२००५ ते २०११ आणि २०११ ते २०१७ या कालावधीमध्ये दोनदा ते राज्यसभेत निवडून आले होते. २०१७ मध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या विनय तेंदुलकर यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यांच्या कुटुंबात आता त्यांची पत्नी आणि त्यांचा एक मुलगा आहे. गोवा काँग्रेस अध्यक्ष पदावरून त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 
 
 
Powered By Sangraha 9.0