एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून अर्थपुरवठा : रवींद्र कदम

07 Jun 2018 14:27:17

 दंगलीमध्ये नक्षलवाद्यांचाच हात असल्याचे स्पष्ट 

अटक केलेल्या आरोपींचा नक्षलवाद्यांशी आणि प्रकाश आंबेडकरांशी संबंध



पुणे : गेल्या ३१ डिसेंबरला पुण्यामध्ये झालेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून अर्थ पुरवठा करण्यात आला होता. तसेच अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे या नक्षलवाद्यांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याची माहिती पुणे पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी आज दिली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आज ते बोलत होते.


कोरगाव भीमा दंगली प्रकरणी पुणे पोलिसांनी सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत आणि शोमा सेन यांना अटक केली आहे. या सर्व आरोपींचे नक्षलवाद्यांशी अत्यंत घनिष्ट संबंध असल्याचे कदम यांनी सांगितले. तसेच यासर्वांचे भारिप प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील संबंध असल्याचे काही पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून त्या संबंधी अधिक तापस केला जात असल्याची माहिती कदम यांनी दिली.


गेल्या १७ एप्रिलला पुणे पोलिसांनी काही संशियत आरोपींच्या घरी छापे मारले होते. या छापेमारीमध्ये अनेक माहिती आणि पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. यानंतर रोना विल्सन यांच्या घरी छापेमारीमध्ये काही हार्डडिस्क, पेनड्राईव्ह आणि पत्र असे अनेक ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे सर्व पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये चौकशीसाठी पाठव्यात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

ढवळेला ८ दिवसांची पोलीस कोठडी

 दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सुधीर ढवळे याला काल सकाळी अटक करण्यात आल्यामुळे त्याला आज सकाळीच न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकील उज्ज्वल पवार यांनी पोलिसांना सापडलेल्या पुराव्यांच्या आधारावर केलेल्या युक्तीवादानंतर पुणे न्यायालयाने ढवळे याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे देखील कदम यांनी सांगितले आहे.

Powered By Sangraha 9.0