महिनाभरात मध्य रेल्वेला दंड स्वरुपात ४२ कोटी १५ लाख महसूल

07 Jun 2018 20:38:58
 
 
महिनाभरात मध्य रेल्वेला दंड स्वरुपात ४२ कोटी १५ लाख महसूल
 
भुसावळ, ७ जून
मध्य रेल्वेने माहे एप्रिल ते मे या कालावधीत विनातिकिट आणि अनाधिकृत प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून ४२ कोटी १५ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे.
 
 
प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी तसेच विनातिकिट प्रवास करणार्‍या आणि योग्य तिकिट खरेदीकरुन प्रवास न करणार्‍या प्रवाशांबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष मोहिम राबविली आहे. या अंतर्गत एप्रिल ते मे २०१८ या कालावधीत अशा अनाधिकृत व विनातिकिट प्रवास करणार्‍या ७ लाख ५९ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. गेल्यावर्षी या कालावधीत ७ लाख २५ हजार कारवाई करण्यात येवून केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. यावर्षी याकारवाईत ४.७० टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी ४१ कोटी २२ लाख दंड वसुल करण्यात आला होता. यावर्षी त्यात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
 
एप्रिल - मे २०१८ या काळात आरक्षित तिकिट दुसर्‍यांना हस्तांतरीत केल्याच्या १ हजार १७ केसेस करण्यात आल्या असुन त्यापोटी १२ लाख ७७ हजार दंड वसुल करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0