मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सप्तशृंगी गडावरील फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण

29 Jun 2018 21:17:17



नाशिक: साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी देवी गडावरील भगवतीचे दर्शन अधिक सुलभ होण्यासाठी फ्युनिक्युलर ट्रॉली तयार करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने २ जुलै रोजी होणार्‍या या ट्रॉली च्या लोकार्पण सोहळ्यास हिरवा कंदील दाखविल्याची माहिती या खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिली.

 

सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल तसेच फ्युनिक्युलर ट्रॉली प्रकल्प संचालक ,लोकप्रतिनिधी , प्रकल्प व्यवस्थापक सुयोग गुरुबक्षाणी प्रा.ली.चे राजीव लुम्बा आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचे दि. २ (जुलै) रोजी ओझर विमानतळावर १२ वाजता आगमन होणार असून १ वाजता फ्नुनिक्युलर ट्रोलीचे लोकार्पण होणार आहे. सुयोग गुरुबक्षाणी रोप वे, सप्तशृंग देवी ट्रस्ट आणि सप्तशृंग गड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

सप्तशृंगी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉलीची संकल्पना मांडण्यात आली होती. हा राज्यातील एकमेव प्रकल्प आहे. त्यानुसार शुभारंभ करण्यात येऊन कामास सुरुवात झाली होती. गेल्या सात वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरु होते. सप्तशृंगी देवीच्या दर्शनसाठी गडावर देशभरातून लाखो भाविक येत असता. त्यांच्या दर्शनाचा मार्ग या ट्रॉलीमुळे सुलभ होणार आहे.नैसर्गिक समृद्धतेने नटलेला हा परिसर पर्यटकांचे देखिल आकर्षण आहे.

Powered By Sangraha 9.0