मराठा मोर्च्याच्या दुसऱ्या पर्वाला आजपासून सुरुवात

    दिनांक  29-Jun-2018


 
 
तुळजापूर :  मराठा आरक्षणासाठी इतके शांततापूर्ण मोर्चे काढून देखील आरक्षण मिळाले नाही, म्हणून मराठा क्रांती मोर्चा आयोजक समितीतर्फे पुन्हा एकदा या मोर्च्याचा पर्वाला सुरुवात झाली आहे. आज तुळजापूर येथून मराठा क्रांती मोर्च्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. तुळजापूर येथील भवानी रस्त्यावरील महाद्वारासमोर जागर गोधंळाचा कार्यक्रम आयोजित करून तसेच तुळजापूर येथे एक रॅली काढून या मोर्च्याला सुरुवात करण्यात आली.
 
 
 
 
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्यावर्षी संपूर्ण राज्यभरात शांततापूर्ण मोर्चे काढण्यात आले होते. एकूण ५८ वेगवेगळ्या ठिकाणांवरून हे मोर्चे काढण्यात आले, मात्र तरी देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही, यामुळे आयोजन समितीतर्फे पुन्हा एकदा मोर्चे काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
 
 
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळावा, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावे, अॅट्रोसिटी कायद्यात दुरुस्ती करावी, कोपर्डी बलात्कार पीडितेला न्याय मिळावा अशा अनेकानेक मागण्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी हे मोर्चे आयोजित करण्यात येत आहेत.