अलिबागमध्ये शिवशाही आणि एसटी बसची धडक; ४० प्रवासी जखमी

28 Jun 2018 13:45:19



 

अलिबाग : अलिबागजवळ कार्लेखिंड येथे शिवशाही आणि एसटी बसचा अपघात झाला आहे. या बसने एक कार आणि रिक्षालाही धडक दिली. या अपघातात दोन्ही बस चालक गंभीर जखमी असून ४० प्रवाशी जखमी झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या दोन्ही एसटी चालकाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर इतर जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 
 

राज्य परिवहन महामंडळाची ‘शिवशाही’ बस मुरुडवरुन स्वारगेटला जात होती. तर एसटी बस पनवेलवरुन अलिबागला येत होती. कार्लेखिंड येथे ओव्हरटेक करताना शिवशाही बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडक दिली त्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामुळे पेण आणि अलिबागकडे जाणारा मार्ग काही काळ ठप्प झाला होता त्यामुळे अलिबाग आणि पेणकडे जाणारी वाहतूक ही हशिवरेमार्गे वळवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात शिवशाही बसच्या अपघातांमध्ये वाढ झाली असून शिवशाहीच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 
Powered By Sangraha 9.0