लातूर हत्याप्रकरणी मंत्री संभाजी निलंगेकर यांची हकालपट्टी करावी : नवाब मलिक

    दिनांक  28-Jun-2018
 
 
 
लातूर : लातूर येथे क्लासेस चालवणाऱ्या चव्हाण नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. राज्यातील मंत्री संभाजी निलंगेकर यांचे बॉडीगार्ड करण सिंह यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रकरण समोर आले तेव्हा निलंगेकरांनी त्या व्यक्तीला ओळखत नसल्याची माहिती दिली. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर करण सिंह आणि निलंगेकर यांचे विविध फोटो व्हायरल झाले. मंत्री संभाजी निलंगेकर हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप पक्षाचे प्रमुख प्रवक्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केला. ते आज मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
 
 
करण सिंह यांच्याकडे कारबाईन सापडली. ही कारबाईन मंत्र्यांचीच आहे का? अशी शंका नवाब मलिक यांनी उपस्थित केली. राज्यात हत्यांचे, गुंडागर्दीचे प्रमाण वाढले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात जंगलराज निर्माण केले आहे अशी टीका मलिक यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. उच्चस्तरीय समिती नेमून निलंगेकरांची चौकशी व्हावी तसेच त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली.
 
 
 
नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ -