भाजपा-खाविआ एकत्र लढणार जळगाव मनपा निवडणूक?

28 Jun 2018 15:42:08

 

भाजपा-खाविआ एकत्र लढणार जळगाव मनपा निवडणूक? 

जळगाव, २८ जून
जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७५ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, भाजप व खाविआ युती करून निवडणूक लढविणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
 
 
शहरात १९ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार आहे. १८ प्रभागात प्रत्येकी ४ जागा, तर एका प्रभागात ३ जागा अशा ७५ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकित भाजपा-खाविआ युती होणार असल्याचे चर्चेत होते. या चर्चेला दुजोरा मिळाला असून, गुरुवारी मुंबई येथे जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. चंदूभाई पटेल, माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
 
Powered By Sangraha 9.0