इन्व्हर्टरमुळे लागलेल्या आगीत बंगला जळून खाक

27 Jun 2018 22:25:08




 

आगीत जुन्या पाचशेच्या नोटा जळून खाक


अंबरनाथ: अंबरनाथला इन्व्हर्टरला लागलेल्या आगीमध्ये एक बंगला जळून खाक झाला असून घटना घडताच घरातील सगळे जण बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

 

येथील पूर्व भागातील बी-केबिन परिसरातील उत्कर्ष सोसायटीमधील बंगल्याच्या आज बुधवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग संपूर्ण बंगल्यात पसरल्याने आगीत घरातील सगळे सामान जळून खाक झाल्याने मोठी वित्तहानी झाली आहे. आगीत या बंगल्यात जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटादेखील जळाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. घरात जुन्या नोटा सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

या बंगल्यात ज्योती कलाल या भाडेतत्त्वावर राहात होत्या. बंगल्याचे मालक नाशिक येथे राहात असल्याचे नगरपालिका अग्निशमन दल अधिकार्यांनी सांगितले. घरातील इन्व्हर्टरला ही आग लागली होती. आग लागताच घरातील व्यक्तींची मोठी धावपळ झाली. मात्र सुदैवाने आग लागताच घरातील सगळे बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. आग विझवल्यानंतर अनेक तास कुलिंगचे काम सुरू होते, असे अग्निशमन सूत्रांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0