नाशिकमध्ये लष्कराचे सुखोई विमान कोसळले

27 Jun 2018 13:24:03



 

नाशिक : तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लष्कराचं सुखोई ३०-२१० हे लढाऊ विमान पिंपळगाव बसवंत येथील वावी ठुशी गावाच्या शिवारात कोसळलं असून या दुर्घटनेत संपूर्ण विमान जळून खाक झालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज सकाळी ११. १५ वाजता ही घटना घडली. या विमानात दोन पायलट होते. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येताच या दोन्ही पायलटने पॅराशूटच्या आधारे विमानातून उड्या मारल्या. त्यानंतर हे विमान कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शिवारात विमान कोसळल्याची माहिती मिळताच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

Powered By Sangraha 9.0