नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण

26 Jun 2018 19:17:01





 

 
मुंबई : ‘श्री गाडगे महाराज मिशन’ या संस्थेच्या वतीने कुर्ला येथील श्री गाडगे महाराज विद्यालय येथे मंगळवार दि.२६ जून रोजी सकाळी ११ वाजता थोर समाजप्रबोधनकार महाराष्ट्रभूषण डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, ज्येष्ठ माहिती अधिकारी अनिल गलगली, प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष भाऊ कोरगांवकर, नगरसेवक परमेश्वर कदम, अशरफ आझमी, शाळेचे संचालक ज्ञानदेव चौधरी, मुख्याध्यापक एस. के. गोडे, मुख्याध्यापिका विद्या कदम, बर्वेनगर येथील श्री सदस्य गणेश सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जीवनपटावर माहिती आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केलेल्या सामाजिक कार्याची चित्रफीत सादर करण्यात आली. या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0