विदर्भ आणि मराठवाड्यात यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज

25 Jun 2018 16:34:13
 
 
 
 
 
मुंबई : मध्य-भारतात या आठवड्यात एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचे संकेत असल्याने २७ व २८ जूनला विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत, तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
 
 
मध्य-महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर आणि नाशिकसारख्या काही जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान ढगाळ वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील कमाल तापमानात घट होईल. परंतु २९ जूनपासून किमान २ जुलैपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असल्यामुळे तापमानात परत वाढ होईल.
 
 
 
शेतकऱ्यांनी हवामानाची ही स्थिती लक्षात घेऊन पेरणीचे आणि लागवडीचे नियोजन करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मुंबईसह कोकणातदेखील या आठवड्यात चांगला पाऊस पडत राहिल, असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0