सोदी अरेबियातील महिलांना गाडी चालविण्याची अखेर परवानगी

    दिनांक  24-Jun-2018

 
 
सौदी अरेबिया : आजचा दिवस हा सौदी अरेबियातील महिलांसाठी अविस्मरणीय ठरला आहे. आता येथे महिलांना देखील चारचाकी गाडी चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सौदी अरेबिया हा जगातील एकमेव असा देश होता, जिथे महिलांना वाहनं चालवण्यास परवानगी नव्हती. मात्र गेल्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही बंदी उठवत महिलांना दिलासा दिला. वाहन चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन लायसन्स असलेल्या महिलांना आता सौदीमध्ये गाडी चालवता येणार आहे.
 
या निर्णयामुळे महिलांना वाहन चालवण्याचं प्रशिक्षण देऊन परवाना देण्यात आला . परवाना मिळाल्यानंतर अनेक महिलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. यापूर्वी सौदीतील महिला बाहेर जाण्यासाठी नातेवाईक, टॅक्सी चालक यांसारख्या अनेक जणांची मदत घ्यावी लागायची. पण आता त्या स्वत: गाडी चालवून स्वावलंबी होऊ शकतील. या निर्णयामुळे तेथील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.