रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता जनजागृती रॅली

23 Jun 2018 12:49:41
 

 
रेल्वे प्रशासनातर्फे स्वच्छता जनजागृती रॅली

 
भुसावळ, 23 जून
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात डीआरएम कार्यालयातर्फे शनिवारी २३  रोजी स्वच्छतेबद्दल जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.यात रेल्वे कर्मचाऱ्यासह  रेल्वेच्या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले.
 
रॅलीचा शुभारंभ डीआरएम आरा.के.यादव यांच्याहस्ते करण्यात आला. ही रॅली डीआरएम कार्यालयापासून सुरु होवून द.शि.विद्यालयाच्या समोरुन हंबर्डीकर चौकातुन रेल्वे स्थानका समोर समाप्त झाली.रॅलीमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याबाबत विविध घोषणा देण्यात आल्या . रॅलीमधील आकर्षक फलक नागरिकांचे लक्षवेधत होते. यावेळीआपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
या रॅलीत डीआरएम आर.के.यादव, एडीआरएम  मनोज सिन्हा सर्व विभागांचे प्रमुख , रेल्वेच्या शाळेचे शिक्षक व विद्यार्थी सहभागी होते.
 
रेल्वे स्थानकावर पथनाटय
रेल्वे प्रशासनातर्फे शुक्रवाररोजी स्थानकावर पथनाटयाव्दारे स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. रेल्वेच्या विद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थांनी पथनाटय सादर केले. यावेळी रेल्वेच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0