शेळ्या-मेंढ्यांची चुकीच्या पद्धतीने निर्यात नको : खा.चव्हाण

22 Jun 2018 21:54:30



नाशिक : ओझर विमानतळावरून शेळ्या-मेंढ्यांची निर्यात सुरू करण्यात आली असली तरी निकृष्ट पद्धतीच्या शेळ्या पाठविल्या गेल्यास भारताचे नाव काळ्या यादीत जाण्याची शक्यता असल्याचा इशारा खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या प्रादेशिक सह आयुक्तांना याबाबत त्यांनी पत्र दिले असून याबाबत लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता ’आय एल ७६’ या कार्गो विमानाद्वारे १४२१ शेळ्यांची निऱ्यात करण्यात आली. या शेळ्या-मेंढ्यांचा दर्जा निकृष्ट आहे. राजस्थानातील अजमेरच्या बाजारातून पीपीआर, एएफडी, ब्रेसला अशा आजाराने आजारी जनावरे स्वस्त दरात आणली जातात. त्या ट्रकने ओझर येथे आणून कोणतीही तपासणी न करता पाठविल्या जातात. मात्र नियमांचे पालन करून शेळ्या-मेंढ्या नीट विमानतळावर तपासून पाठविल्या जाव्यात, असे खा. चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे.

 
Powered By Sangraha 9.0