आम्ही कोण म्हणोनी काय पुसता...

    दिनांक  21-Jun-2018   
परवा अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा भारतीय सहकारी यांच्या डायर्‍या साडपल्याची बातमी होती. त्यात त्यांनी भारतीय लोकांबद्दल फार चांगले शेरे मारलेले नाहीत. त्यांनी भारतीय लोकांना चक्क मूर्खच म्हटले. अर्थात गुरू रवींद्रनाथ टागोर यांचा अपवाद केला. त्यांना त्याने गुरुस्थानी ठेवले. आता भारतीयांची अशी मूर्खातच गणना करणार्‍या आइन्स्टाईन यांच्यावर समाजमाध्यमांवरील कायम अभिनिवेशांत असणार्‍यांनी हल्ला चढविला नाही. नाहीतर अलीकडे समाजमाध्यमांवर जितकी ज्ञानी माणसं दिसू लागली आहे आणि त्यांच्या ज्ञानाने समाजमाध्यमांच्या दाही दिशा कशा उजळूनच आल्या आहेत, ते बघायला आज आइन्स्टाईन असते तर त्यानी भारतीयांना मूर्ख म्हणण्याचे धाडस केले नसते. यच्चयावत जगातले सगळेच उच्चकोटीचे ज्ञान कसे भारतातच होते, हे सांगण्याची स्पर्धाच सुरू असते. अर्थात, हा अभिनिवेश काही केवळ भारतातच आहे असे नाही. प्राचीन संस्कृती म्हणण्यापेक्षा इतिहास असणार्‍या अनेक देशांमध्ये हा वृथा अभिमान असतोच. चीनमध्ये तर तो भारतापेक्षाही जास्त आहे. ग्रीक, काही इस्लामिक देशांतही ते तसे आहे. जे काय शोध आजच्या विज्ञान युगात मानवाच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहेत, सवयीचे झाले आहेत की ते चमत्कारही वाटत नाहीत, ते आमच्या देशात आधीच लागले होते, असे म्हणणार्‍यांची संख्याही अफाट आहे. त्यावरून आम्ही किती ज्ञानी आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न असावा. तर मग मधल्या काळात आम्ही आमचा हा वारसा कसा नि कुठे गमावला? इतर गोष्टी परंपरेने पुढच्या पिढ्यांपर्यंत संक्रमित झाल्या, तसे हे ज्ञान का नाही झाले? आता आम्हाला कळते की, आम्ही इतके उन्नत होतो, तर मग अवनतीचे टोक गाठणार्‍यांना काय म्हणायचे?
 
 
आइन्स्टाईनच्या कथित टिपण्णीवर नेमके काय बोलावे, असा सवाल निर्माण झाला असेल. एकतर त्यांचा मेंदू हा आजवरच्या मानवी मेंदूतला सगळ्यात सुपर मेंदू आहे. म्हणजे त्यांच्या निधनानंतर त्यांचा मेंदू राखून ठेवण्यात आला. १८ एप्रिल १९५५ रोजी आइनस्टाइन यांची प्राणज्योत मालवली. आइनस्टाइन यांचा मेंदू त्याच्या मृत्यू नंतर प्रिन्स्टन हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजीच्या प्रयोगशाळेत परीक्षण करण्यासाठी जतन केला गेला. त्यांच्या मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागाचे नमुने तपासले गेले, त्यात अनेक आश्‍चर्यकारक गोष्ठी उघड झाल्या. आइनस्टाइन यांच्या मेंदूबाबत स्वतंत्र लेख लिहिता येईल. आजवर त्यांच्या मेंदूवर एक लाखाहून अधिक शास्त्रीय लेख वैज्ञानिकांनी प्रसिद्ध केले आहेत. अजूनही त्यावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे अशा एकमेवाद्वितीय मेंदूच्या माणसाने आपल्याला मूर्ख म्हटले तर तो त्याचा अधिकार आहे, असे समजूनही काही लोक शांत बसले असतील. दुसरे असेही आहे की, अल्बर्ट आइन्स्टाईन हे भारतातल्या कुठल्याच राजकीय पक्षाचे, विचारधारेचे नाहीत. वयाच्या दहाव्या वर्षीच परमेश्‍वर या संकल्पनेवरचा त्यांचा विश्‍वास उडला होता. त्यामुळे ते कुठल्या धर्माचे नव्हते. त्यामुळे धर्म हेच ज्ञान आहे, असे समजणारे असे कुणीही त्यांचे पाठीराखे किंवा विरोधक जगात नाहीत. ते जन्माने जर्मन ज्यू आणि कर्माने अमेरिकन होते. त्यामुळे भारतात त्यांच्या टीकेने कुणाचीही अस्मिता दुखावल्याने राजकीय मुद्दाही करता येत नाही. बरे, वाद निर्माण करायचा तर त्यासाठी खूपच ज्ञानी ताकद लागणार असल्याने कुणी फारसे त्या फंदात पडलेले नाही.
 
‘धर्म और मजहब की बातें मैने कीही नही
उतनी फालतू की फुर्सत मुझे थीही नही’
अशी त्यांची अवस्था होती. ते दहाएक वर्षांचे असताना त्यांच्या मोठ्या भावाने त्यांची एका ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याशी ओळख करून दिली. त्यांच्या भेटी होत राहिल्या. तो अल्बर्टला पुस्तके वाचायला देत असे. मॅक्स टॅलमड हे त्याचे नाव. इ. स. १८८९ ते इ. स. १८९४ या कालखंडात दर आठवड्यात होणार्‍या त्यांच्या भेटीत टॅलमड यांनी अनेक अर्धधार्मिक संकल्पना मांडून बायबलमधील अनेक गोष्टी असत्य असू शकतात, या विचाराकडे अल्बर्टचे लक्ष वेधले. घरी हे असे वातावरण असल्याने त्यांची वाढ अशी विज्ञानमार्गाकडे झाली. आता अशा माणसाने आपल्याला मूर्ख म्हणण्याइतकीदेखील आपली दखल घ्यावी, हा आपला गौरवच वाटला असेल अनेकांना...
आता आइन्स्टाईननेच आम्हाला मूर्ख म्हटले आहे का? हेही काही पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञानेच ओळखले आणि केले असे नाही. आमच्या रामदासस्वामींनीही दासबोधात मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. थोडीथोडकी नव्हे, तर चक्क १०८ लक्षणे सांगितली आहेत. त्यांचे हे ज्ञान पूर्ण स्वदेशीच होते. खरेतर ते त्यांचे आकलन होते. ते त्यांनी आमच्या जीवनाचे निरीक्षण करूनच कमावले होते. जन्मदात्यांना विरोध करणारा, स्त्री आधीन जीवन जगणारा, परस्त्रीवर प्रेम करणारा, श्‍वसूरगृही वास करणारा, सामर्थ्यावीण सत्ता गाजविणारा, स्वस्तुती करणारा, वडिलांची कीर्ती सांगणारा, रस्त्याने खात जाणारा, थोडे करून अधिक सांगणारा, आपल्यात काहीच कुवत नसताना अभिमान धरणारा... ‘तो एक मूर्ख’ असे रामदासांनी सांगितले आहे.
देवद्रोही गुरुद्रोही| मातृद्रोही पितृद्रोही|
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही| तो येक मूर्ख...
अशी मूर्खांची लक्षणे रामदासांनी सांगितली आहेत. ‘बहुत जागते जन| तयांमध्ये करी शयन| परस्थळीं बहु भोजन करी, तो येक मूर्ख...’ असेही समर्थ म्हणाले आहेत. आता यातले आम्ही काय नाही, याचा विचार करायचा असतो. ते कल्याने काय होईल? तर शहाणे ठरण्यासाठी या ‘तो एक मूर्ख’ यात आपली संभावना होऊ नये यासाठी मूर्खांच्या लक्षणांचा आपल्याला त्याग करावा लागेल. रामदासांनी किती शतके आधी हे सांगून ठेवले आहे. आम्ही त्याचे पालन केले का? उलट अधिक जोमाने आम्ही मूर्खाची हे लक्षणे अंगीकारली. बहुतांनी तर दासबोध वाचलेलाच नाही अन् त्याहीपेक्षा अधिकांना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही! तरीही आम्ही आमच्या वाडवडिलांचीच कीर्ती सांगण्यात मग्न असतो. ‘हे तर आमच्या देशात फार पूर्वीच झाले.’ असे सांगतो. अभिमानाने सांगतो अन् वर्तमानात काय असते? शहाणपणाच्या गोष्टी चार सांगणारेच नव्हे, तर प्रत्यक्षात ते जगून मग सांगणारे अनेक संत होऊन गेले. गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजींपासून तुकारामांपर्यंत... विविध प्रांतात, भाषांत झाले. आज जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणार्‍या आमच्या देशात स्वच्छता शिकवावी लागते. पंतप्रधानांना त्यासाठी वेळ द्यावा लागतो. स्वच्छता ही आमची परंपरा नव्हती का? आमची गावे गोदरीमुक्त नव्हती का? पाण्याचे नियोजन आम्ही करतच होतो. जलसंधारण ही आमची जीवनशैली होती... कुठे गमावले आम्ही हे? पॉश गाडीतून कचरा फेकणार्‍याला दटावले अन् त्याचा व्हिडीओ व्हायरल केला म्हणून त्या धनसंपन्न पोरट्याची माता अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीलाच दाटते. कचरा हमरस्त्यावर फेकणे हा त्या मातेला तिच्या लेकराचा मूलभूत हक्क वाटतो. तसे करताना रोखणे, हा अगाऊपणा वाटतो. व्हिडीओ व्हायरल करताना तिच्या पुत्राची ओळख मिटविली नाही, ही त्याची बदनामी वाटते... याला काय म्हणायचे? कायदा मोडण्याचा अधिकार असणे म्हणजे तो मोठा माणूस असतो. सिग्नल मोडला अन् पोलिसने अडविले तर तो अपमान वाटतो. ‘‘मालूम नही क्या मैं कौन हूं?’’ हा खास उद्दाम असा प्रश्‍न आहे.
 
आमच्या परंपरा उज्ज्वल होत्या, त्या परंपरांचा र्‍हास करणारे मग आम्ही कोण? ते सारेच संस्कृतात होते, असे म्हणत जबाबदारी झटकायची कशी? ती ज्ञानभाषाच आम्ही संपवून टाकली आहे. आमच्या अस्मिता ज्ञानाशी जोडलेल्या नाहीत. धार्मिक अज्ञानाशीच जोडलेल्या आहेत. त्यात देश म्हणून आम्ही आमचा र्‍हास करून घेतो. ते तमक्या धर्माचे म्हणून ज्ञान नाकारणे, ज्ञानवंतांनाही विभागून घेणे, त्यांच्याशी संवादही नाकारणे अन् तो कसाकाय तमक्यांच्या मंचावर जातो, असा सवाल करणे, यातूनही राष्ट्र म्हणून आपले नुकसान होत असते, हे ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना काय म्हणावे? रामदासस्वामी असते तर त्यांच्या मूर्खांच्या लक्षणांची यादी वाढत गेली असती अन् तरीही आम्ही, ‘आम्ही कोण म्हणोनी काय पुसता, आम्ही असू लाडके’ असेच म्हणत असू, तर सोज्ज्वळ भाषेत सांगायचे झाले तर आम्ही उंटावरचे शहाणे ठरतो!
---
आता आइन्स्टाईननेच आम्हाला मूर्ख म्हटले आहे का? हेही काही पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञानेच ओळखले आणि केले असे नाही. आमच्या रामदासस्वामींनीही दासबोधात मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. थोडीथोडकी नव्हे, तर चक्क १०८ लक्षणे सांगितली आहेत. त्यांचे हे ज्ञान पूर्ण स्वदेशीच होते. खरेतर ते त्यांचे आकलन होते. ते त्यांनी आमच्या जीवनाचे निरीक्षण करूनच कमावले होते. जन्मदात्यांना विरोध करणारा, स्त्री आधीन जीवन जगणारा, परस्त्रीवर प्रेम करणारा, श्‍वसूरगृही वास करणारा, सामर्थ्यावीण सत्ता गाजविणारा, स्वस्तुती करणारा, वडिलांची कीर्ती सांगणारा, रस्त्याने खात जाणारा, थोडे करून अधिक सांगणारा, आपल्यात काहीच कुवत नसताना अभिमान धरणारा... ‘तो एक मूर्ख’ असे रामदासांनी सांगितले आहे.
देवद्रोही गुरुद्रोही| मातृद्रोही पितृद्रोही|
ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही| तो येक मूर्ख...
अशी मूर्खांची लक्षणे रामदासांनी सांगितली आहेत. ‘बहुत जागते जन| तयांमध्ये करी शयन| परस्थळीं बहु भोजन करी, तो येक मूर्ख...’ असेही समर्थ म्हणाले आहेत. आता यातले आम्ही काय नाही, याचा विचार करायचा असतो. ते कल्याने काय होईल? तर शहाणे ठरण्यासाठी या ‘तो एक मूर्ख’ यात आपली संभावना होऊ नये यासाठी मूर्खांच्या लक्षणांचा आपल्याला त्याग करावा लागेल. रामदासांनी किती शतके आधी हे सांगून ठेवले आहे. आम्ही त्याचे पालन केले का? उलट अधिक जोमाने आम्ही मूर्खाची हे लक्षणे अंगीकारली. बहुतांनी तर दासबोध वाचलेलाच नाही अन् त्याहीपेक्षा अधिकांना तर असा काही ग्रंथ आहे, हेही माहिती नाही! तरीही आम्ही आमच्या वाडवडिलांचीच कीर्ती सांगण्यात मग्न असतो. ‘हे तर आमच्या देशात फार पूर्वीच झाले.’ असे सांगतो. अभिमानाने सांगतो अन् वर्तमानात काय असते? शहाणपणाच्या गोष्टी चार सांगणारेच नव्हे, तर प्रत्यक्षात ते जगून मग सांगणारे अनेक संत होऊन गेले. गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजींपासून तुकारामांपर्यंत... विविध प्रांतात, भाषांत झाले.
 
आज जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणार्‍या आमच्या देशात स्वच्छता शिकवावी लागते. पंतप्रधानांना त्यासाठी वेळ द्यावा लागतो. स्वच्छता ही आमची परंपरा नव्हती का? आमची गावे गोदरीमुक्त नव्हती का? पाण्याचे नियोजन आम्ही करतच होतो. जलसंधारण ही आमची जीवनशैली होती... कुठे गमावले आम्ही हे? पॉश गाडीतून कचरा फेकणार्‍याला दटावले अन् त्याचा व्हिडीओ व्हायरल केला म्हणून त्या धनसंपन्न पोरट्याची माता अनुष्का शर्मा अन् विराट कोहलीलाच दाटते. कचरा हमरस्त्यावर फेकणे हा त्या मातेला तिच्या लेकराचा मूलभूत हक्क वाटतो. तसे करताना रोखणे, हा अगाऊपणा वाटतो. व्हिडीओ व्हायरल करताना तिच्या पुत्राची ओळख मिटविली नाही, ही त्याची बदनामी वाटते... याला काय म्हणायचे? कायदा मोडण्याचा अधिकार असणे म्हणजे तो मोठा माणूस असतो. सिग्नल मोडला अन् पोलिसने अडविले तर तो अपमान वाटतो. ‘‘मालूम नही क्या मैं कौन हूं?’’ हा खास उद्दाम असा प्रश्‍न आहे. आमच्या परंपरा उज्ज्वल होत्या, त्या परंपरांचा र्‍हास करणारे मग आम्ही कोण? ते सारेच संस्कृतात होते, असे म्हणत जबाबदारी झटकायची कशी? ती ज्ञानभाषाच आम्ही संपवून टाकली आहे. आमच्या अस्मिता ज्ञानाशी जोडलेल्या नाहीत. धार्मिक अज्ञानाशीच जोडलेल्या आहेत. त्यात देश म्हणून आम्ही आमचा र्‍हास करून घेतो. ते तमक्या धर्माचे म्हणून ज्ञान नाकारणे, ज्ञानवंतांनाही विभागून घेणे, त्यांच्याशी संवादही नाकारणे अन् तो कसाकाय तमक्यांच्या मंचावर जातो, असा सवाल करणे, यातूनही राष्ट्र म्हणून आपले नुकसान होत असते, हे ज्यांच्या लक्षात येत नाही, त्यांना काय म्हणावे? रामदासस्वामी असते तर त्यांच्या मूर्खांच्या लक्षणांची यादी वाढत गेली असती अन् तरीही आम्ही, ‘आम्ही कोण म्हणोनी काय पुसता, आम्ही असू लाडके’ असेच म्हणत असू, तर सोज्ज्वळ भाषेत सांगायचे झाले तर आम्ही उंटावरचे शहाणे ठरतो!
---