अखेर लाचखोर घरतवर निलंबनाची कारवाई

19 Jun 2018 20:48:17



जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी : आधारवाडी कारागृहात रवानगी

डोंबिवली : कडोंमपाचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना मागील आठवड्यात ८ लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर लाचलुचपत विभागाचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यासह अन्य एकाला महापालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच मंगळवारी घरत यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी घरत यांनी जामीन अर्ज दाखल केला होता मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळत त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात केली.

संजय घरत याच्यासह अन्य दोघांना बुधवारी दि.१३ जून रोजी आठ लाखांची लाच घेताना पालिका मुख्यालयातील त्याच्या दालनात अटक करण्यात आली होती. गुरुवारी त्यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने आधी तीन दिवसांची नंतर दोन दिवसांची अशी एकूण पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

मंगळवारी कोठडीची मुदत संपल्याने तिघांना पुन्हा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने या तिघांना २ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. यावेळी संजय घरत यांच्या वकिलांनी जामीन देण्यासाठी अर्ज दाखल केला असता न्यायालयाने सुनावणी झाली नसली तरी त्यावर बुधवारी सुनावणी करण्यात येणार आहे.

त्यामुळे संजय घरत याच्यासह लिपिक ललित आमरे व भूषण पाटील यांची अखेर कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे  याचबरोबर घरत यांच्या निलंबनाची कारवाईही मंगळवारी आयुक्त गोविंद बोडके यांनी केली. घरत यांच्यासह ललित आमरे यांनाही निलंबित

Powered By Sangraha 9.0