भारत-चीन सीमेवर भूकंप

19 Jun 2018 08:28:32



जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील अक्साई चीनच्या प्रदेशमध्ये आज सकाळी भूकंपाचा तीव्र झटका बसला आहे. भूकंपाची तीव्रता ही ४.५ रिश्टर ऐवढी मोजण्यात आली असून यामध्ये अक्साई चीनजवळ लेह लडाख तसेच राज्यातील बऱ्याच भागात हा भूकंपाचा झटका जाणवला आहे.

भारताच्या उत्तरेला असलेल्या भारत-चीन सीमेजवळ पहाटे ५.३० च्या सुमारास हा भूकंप झाला. अगदीजवळ जमिनीखाली १० किमी अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या भूकंपाच्या तीव्रतेमुळे अक्साई चीन, लेह लडाख, कारगिल, अनंतनाग या भागांना देखील या भूकंपाचा झटका बसला. परंतु सुदैवाने यामध्ये अद्याप कसल्याही प्रकारच्या दुर्घटनेची माहितीसमोर आलेली नाही.

Powered By Sangraha 9.0