कौशल्य विकास प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळा

19 Jun 2018 22:56:23



 

नाशिक : आधार महिला संस्था आणि निर्धार सेवा संघ यांच्या संयुक्त विदयमाने इगतपुरीमधील वनवासी व इतर मागासवर्गीय २०० महिलांना विनामुल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण सोहळा, माऊली वृद्धाश्रम, पींप्रीसदो, इगतपुरी येथे २१ जून रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
 

या सोहळयाला महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आधार महिला संस्थेच्या अध्यक्षा योजना ठोकळे यांनी दिली. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन निर्धार सेवा संघाचे अध्यक्ष व्ही. व्ही. करंदीकर यांनी केले आहे.

Powered By Sangraha 9.0