बेकायदा सावकारी, पाच अटकेत

18 Jun 2018 22:03:03



नाशिक : बेकायदा सावकारी करून पठाणी पद्धतीने कर्जवसुलीचा त्रास देऊन दाम्पत्यास आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या अंबडच्या पाचही संशयित सावकारांना अटक करण्यात आली. राहुल जाधव, अमोल मंगेश सोनवणे, अशोक केदू होळकर, सुनील पूरकर आणि प्रवीण भाऊ (वेद मंदिर) अशी अटक करण्यात आलेल्या खासगी सावकारांची नावे आहेत.त्यांच्या बेकायदा कर्जवसुलीने त्रस्त झालेल्या वासुदेव अंबादास जाधव (३८) व संगीता वासुदेव जाधव (३४, दोघे रा. अष्टविनायकनगर, कमल रेसिडेन्सी, नवीन नाशिक) या दाम्पत्याने शुक्रवारी (दि.१५ जून) दुपारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी या पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली. यात दाम्पत्याने घेतलेले कर्ज आणि दिलेले पैसे याचाही तपशील नमूद केला होता.

Powered By Sangraha 9.0