पालघरमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू

    दिनांक  17-Jun-2018


पालघर : जिल्ह्यातील केळवे येथे चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काल दुपारी हे चौघे जण समुद्रात बुडाले होते. या चौघांपैकी एकाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून अन्य तिघांच्या पोलीस शोध घेत आहेत.

मुंबईतील नालासोपारा येथून काल हे चौघे जण आणि त्यांचे आणखी तीन मित्र असे सात जण याठिकाणी फिरायला म्हणून आले होते. यावेळी दुपारी सर्व जण केळवे येथील किनाराजवळ पोहण्यासाठी म्हणून पाण्यात उतरले होते. परंतु अचानक समुद्राचे पाणी खवळल्यामुळे यातील चार जण पाण्यात ओढले गेले. यावेळी किनारजवळ असलेल्या त्यांच्या मित्रांनी मदतीसाठी आरडओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर जवळील स्थानिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेत या तिघांना मदत केली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देत बुडालेल्या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान यातील एकाचा मृतदेह आज दुपारी पोलिसांच्या हाती लागला.