शिक्षक परिषदेचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा

15 Jun 2018 23:09:52



ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजप व रिपब्लिकन पक्ष (ए) आघाडीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना अखिल भारतीय शिक्षक परिषदेने पाठिंबा जाहीर केला आहे.

 
 

अखिल भारतीय शिक्षक परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या झालेल्या बैठकीत हा पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. पाटील यांनी भाजपचे जिल्हा प्रभारी व आ. प्रसाद लाड यांच्याकडे पत्र सुपूर्द केले. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्याची बैठक झाली.

 
 

”केंद्र व राज्य सरकार यांनी केलेली विकासात्मक कामे मतदारांपर्यंत घेऊन जा. केंद्र सरकारची कामे नागरिकांना समजावून सांगा,” असे आवाहन मधु चव्हाण यांनी केले. परंपरागत असणार्‍या भाजपच्या मतदारसंघावर पुन्हा एकदा आमदार विजयी होईल,” असा विश्वास व्यक्त केला. पक्षातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांना जास्तीत जास्त प्रचारात सक्रिय करून घेणार आहोत, अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0