निरव मोदी लंडनमध्ये ?

11 Jun 2018 12:36:40

ब्रिटेनकडे राजाश्रयाची मागणी 



पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी निरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. लंडनमधील स्थानिक वृत्तपत्रांने दिलेल्या माहितीनुसार भारतामधून फरार झाल्यानंतर मोदी हा ब्रिटेनमध्ये असून ब्रिटेन सरकारकडे त्याने राजाश्रयाची मागणी केली आहे. परंतु यावर अजून कसल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नसून याविषयी ब्रिटेनच्या गृह मंत्रालयाला विचारले असता, मंत्रालयाने मात्र याविषयी अधिक माहिती देण्याविषयी नकार दिला आहे.

पीएनबीला १३ हजार कोटी रुपयांचा चुना लावून गेल्या तीन महिन्यांपासून निरव मोदी हा फरार झाला आहे. इडीने आतापर्यंत त्याची अनेक ठिकाणची संपत्ती जप्त केली असून त्याच्यावर आरोपपत्र देखील दाखल केलेले आहे. परंतु अद्याप त्याच्या ठावठिकाणा मात्र भारत सरकारला लागलेला नाही. गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये निरव मोदीविषयी सांगताना स्पष्ट केले होते कि, मोदीचा पासपोर्ट भारत सरकारने याअगोदरच रद्द केलेला आहे. त्यामुळे निरव मोदीने कोणत्याही देशात जाण्याचा अथवा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला तर भारत सरकारला याविषयी तत्काळ माहिती मिळेल. तत्यामुळे भारत सरकारने यावर अद्याप प्रतिक्रिया न दिल्यामुळे मोदीच्या लंडनमधील वास्तव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
Powered By Sangraha 9.0