उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू पनामा देशाच्या दौऱ्यावर

09 May 2018 11:36:27
 
 
 
 
 
पनामा : उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू सध्या विदेश दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी काल ग्वाटेमाला या देशाला भेट दिली असून आज ते पनामा येथे ते उतरले आहेत. ग्वाटेमालाच्या दौऱ्यात त्यांनी ग्वाटेमालाचे राष्ट्रपती जिमी मोरालेस यांची भेट घेतली होती. तसेच यावेळी त्यांनी एंटीगाचे मेयर सुसान हेदी असेंसिओ लुएग यांची देखील भेट घेतली. 
 
 
 
 
 
 
 
एंटीगा येथील चर्चमध्ये त्यांनी जावून त्या चर्चची पाहणी केली. सुसान हेदी असेंसिओ लुएग यांनी यावेळी एंटीगा शहराची संपूर्ण माहिती व्यंकैय्या नायडू यांना दिली. यावेळी व्यंकैय्या नायडू हे काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करणार असून यात ते व्यापार, तंत्रज्ञान, माहिती आणि तंत्रज्ञान या बद्दल चर्चा करणार आहेत. 
 
 
 
 
 
भारत आणि ग्वाटेमाला या दोन देशांमध्ये काल एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू हे सध्या तीन देशाच्या दौऱ्यावर गेले आहे. तेथे त्यांनी काल ग्वाटेमालाचे राष्ट्रपती जिमी मोरालेस यांची भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीदरम्यान एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. शिक्षणाद्वारे राजकीय मदत मजबूत करण्यासाठीचे करार या दोन देशांमध्ये करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0