सुरत येथील इसमाचा काकर्देे दिगर येथे खून

07 May 2018 14:08:56
 

 
 
नंदुरबार :
सुरत येथे वास्तव्यास असलेल्या विलास पाटील या ३० वर्षीय युवकाचा काकर्दे दिगर, ता.शहादा जि.नंदुरबार येथे खून झाला असल्याची घटना विवारी उघडकिस आली असून याबाबत सारंगखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विलास पाटील अंदाजे वय ३० रा. कौठळ, ह.मु. सुरत हे ६ रोजी हेमंत दिलीप शिरसाठ यांच्या खळ्या जवळ मयत आढळून आले.मयताच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारुन जीवे ठार मारले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी एम.बी.पाटील, स.पो.नि.एम.डी पगार यांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली.
 
 
याबाबत रतीलाल सुकलाल शिरसाठ यांच्या फिर्यादिवरुन अज्ञान आरोपी विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि एम.डी.पगार करीत आहे.
Powered By Sangraha 9.0