कर्नाटक निवडणुका : भाजपकडून जाहीरनामा घोषित

04 May 2018 12:20:05
 
 
 
 
 
कर्नाटक : आज भारतीय जनता पक्षाने कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आहे. बेंगळूरु येथे हा जाहीरनामा घोषित करण्यात आला असून या जाहीरनाम्यात भाजपने अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. या जाहीरनाम्यान भाजपने शेतकरी, महिला आणि बालक यांच्यासाठी बरेच कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बीएस येदियुरप्पा आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे नेते यांनी मिळून आज हा जाहीरनामा घोषित केला आहे.
 
 
 
 
 
या जाहीरनाम्यात भाजपने महिला, शेतकरी यांना खुश करण्याचा चांगलाच प्रयत्न केला आहे. ‘स्त्री सुविधा योजनेंत’र्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना सॅनीटरी पॅड मोफत देण्यात येईल तसेच शाळेत शिकणाऱ्या मुलींना १ रुपयाला एक सॅनीटरी पॅड देण्यात येईल. ‘मुख्यमंत्री स्मार्ट फोन योजनेंत’र्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्मार्ट फोन दिले जातील. दुग्धउत्पादनात महिलांचा समावेश करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाईल.
 
 
 
 
 
महिलांना २ लाखांपर्यंतचं कर्ज फक्त १ टक्का व्याजाने देणार तसेच दुष्काळग्रस्त भागातील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत आणि शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दहा तास मोफत वीज पुरवण्यात येईल. दारिद्र्य रेषेखालील महिलांना लग्नाच्या वेळी ३ ग्रॅमचं मंगळसूत्र मोफत आणि ३०० हून अधिक अन्नपूर्णा कँटीन आणि महिलांच्या व मुलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण राज्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येईल. भाजपने इतक्या मोठ्या प्रमाणात आश्वासने या जाहीरनाम्यात नमूद केली आहेत. 
 
 
Powered By Sangraha 9.0