कल्याण-नगर महामार्ग पावसाळ्यात वाहतुकीस डोकेदुखी ठरणार

31 May 2018 22:58:06



मुरबाड, : वर्षभरातील घाटातील आपघात व निकृष्ट दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कामे पाहाता पावसाळ्यात नेमके घाट काय आव्हान पेलवणार, याविषयी आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

माळशेज घाट हा पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण असून घाटात पर्यटन विभागाच्या साहाय्याने अनेक ठिकाणी सुशोभिकरण करण्यात आले आहे तर राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्तारुंदीकरण करण्यासाठी अनेक ठिकाणी दरड कापल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यात याचा परिणाम दिसू शकतो, असे नित्य प्रवास करणारे प्रवाशी चर्चा करत आहेत. पावसाळ्यात माळशेज घाटात अनेक ठिकाणी रस्ता खचू शकतो, असेही मत व्यक्त होत आहे. सध्या हा महामार्ग चौपदरीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असून कल्याण महानगर पालिका, कल्याण राष्ट्रीय महामार्ग व मुरबाड महामार्ग असा या महामार्ग देखरेखीसाठी विभाग आहेत, तर म्हारळ गावाजवळून जाणार्‍या महामार्गावर पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास वाहनचालकांसह प्रवाशांना या रस्त्याने रेंगाळत व कंटाळवाणा प्रवास करावा लागणार आहे. आगामी पावसाळ्यात माळशेज घाटात पर्यटकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे, हे पोलिसांना तर घाटातील अपघातस्थळाची सुरक्षा हे राष्ट्रीय महामार्ग विभागाला एक आन ठरणार आहे.

Powered By Sangraha 9.0