पाकिस्तानच्या 'एनएसजी' प्रवेशाला अमेरिकेचा नकार

    दिनांक  31-May-2018


वॉशिंग्टन डी.सी. : अणु पुरवठा गटामध्ये (एनएसजी) प्रवेश करण्याची तीव्र इच्छा मनात बाळगून बसलेल्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना अमेरिकेने आज पुन्हा खोडा घातला असून एनएसजीमध्ये प्रवेशासाठी पाकिस्तान केलेला अर्ज अमेरिकने नाकारला आहे. अमेरिकेमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय आण्विक प्रसार संस्थेने यासंबंधी आपला विरोध दर्शवला असून पाकिस्तानला एनएसजीमध्ये प्रवेश देणे सध्या योग्य नाही, असे या संस्थेनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानने एनएसजी प्रवेशासाठी केलेला अर्ज अमेरिकेने नाकारला आहे.

पाकिस्तानच्या अर्जावर विचार करण्यासाठी तसेच यावर अभ्यास करण्यासाठी म्हणून आण्विक प्रसार संस्थेने अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अॅण्ड इंटरनॅशनल सिक्युरिटी (आयएसआयएस) या संस्थेला निर्देश दिले होते. यानंतर आयएसआयएसच्या डेविड अलब्राइट, सारा बुर्कहार्ड आणि फ्रँक पॅबियन यांनी पाकिस्तानसंबंधी तयार केलेला अहवाल आज या संस्थेपुढे सादर केला. यामध्ये आयएसआयएसने पाकिस्तानची तुलना थेट उत्तर कोरियाशी करत, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अणु उर्जा वापराविषयी माहिती दिली आहे. पाकिस्तानने गेल्या चार दशकांमध्ये आपल्या देशामध्ये सातत्याने अणु उर्जा वापरला आणि त्यापासून शस्त्र बनवण्याला चालना दिली असल्याचे यात म्हटले गेले आहे. याचबरोबर येथे सरकारबरोबरच नागरिक आणि सैन्य हे देखील स्वतंत्रपणे या अणु उर्जेवर काम करत असून त्यापासून उर्जा आणि शस्त्र तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सध्या तरी एनएसजीमध्ये प्रवेश देणे योग्य नाही, असे स्पष्ट मत अहवालामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

याचबरोबर पाकिस्तान येत्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये दोन मोठ्या अणु भट्ट्या उभारण्यासाठी कार्य करत आहेत. या अणु भट्ट्यांची क्षमता ही गरजेपेक्षा अधिक असून पाकिस्तान या अणु भट्ट्यांची निर्मिती का करत आहे ? यावर अमेरिका, चीन आणि इतर देशांनी पाकिस्तान चौकशी करावी व पाकिस्तानने देखील या देशांना आपल्या प्रकल्पाची माहिती देऊननंतरच हे प्रकल्प पूर्ण केले पाहिजे, असे देखील या अहवालात म्हटले आहे. दरम्यान यानंतर उपग्रहाद्वारे घेण्यात आलेले पाकिस्तानचे काही छायाचित्र देखील यावेळी दाखवण्यात आले व यानंतर पाकिस्तान हा अर्ज अमेरिकेकडून रद्द करण्यात आला.

संस्थेनी प्रसिद्ध केलेली पाकिस्तानची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे : संस्थेनी सादर केलेला संपूर्ण अहवाल :