आधारमुळे 'गोपनीयते'ला धोका नाही : बिल गेट्स

03 May 2018 19:58:17





आधार कार्ड ही फक्त एक बायोमॅट्रीक वेरीफिकेशन सिस्टीम असून त्यामुळे नागरिकांच्या गोपनियतेला कसल्याही प्रकारचा धोका पोहचू शकत नाही, असे वक्तव्य मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे. तसेच या तंत्रज्ञानाच वापर जगात सर्वत्र व्हावा, यासाठी म्हणून आपण वर्ल्ड बँकेला मदतनिधी देखील देण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी आधार कार्डचे तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे असून याचे नागरिकांना अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान जगभरातील देशांमध्ये वापरले गेले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. तसेच आधार कार्डचे तंत्रज्ञान बनवण्यामध्ये मोलाचा वाटा असलेले इन्फोसिसचे नंदन निलखाणी हे आपले अत्यंत चांगले मित्र असून त्यांनी या तंत्रज्ञानाचा जगभर प्रसार करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांना आवाहन करेल असे गेट्स यांनी म्हटले आहे. तसेच यासाठी वर्ल्ड बँकेला आवश्यक इतका निधी देण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान गेट्स यांच्या वक्तव्यानंतर याची बातम्या सोशल मिडीयावर अत्यंत वेगाने वायरल होऊ लागल्या आहेत. गेट्स यांच्या या वक्तव्यावर सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात चर्चा देखील सुरु झाली आहे. केंद्र सरकारला आधारच्या नावावर सातत्याने लक्ष करू पाहणाऱ्या विरोधकांसाठी ही अत्यंत चांगले उत्तर असल्याची प्रतिक्रिया काही जण देत आहेत. तर काही जणांच्या मते मात्र अजूनही ही व्यवस्था गोपनियतेला घातकच आहे.

Powered By Sangraha 9.0