सीबीएसई बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर

29 May 2018 17:52:13


केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड अर्थात सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत. आज दुपारीच सीबीएसईने हा निकाल जाहीर केला असून एकूण ८६.७० टक्के इतका यंदाचा निकाल लागला असल्याचे सीबीएसईने जाहीर केले आहे. दरम्यान यंदा देखील या परीक्षेमध्ये मुलींनीच बाजी मारली असून देशातील एकूण चार मुलींना ५०० पैकी ४९९ गुण मिळाल्याचे समोर आले आहे.

सीबीएसईच्या http://cbseresults.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आज दुपारी १ वाजता सीबीएसईने हा निकाल जाहीर केला आहे. या निकालानुसार परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी ८८.६७ टक्के मुली या उत्तीर्ण झाल्या असून एकूण टक्केवारी पैकी ८५.३२ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. दरम्यान यामध्ये प्रखर मित्तल, रिमझिम अग्रवाल, नंदिनी गर्ग आणि श्रीलक्ष्मी या चार मुलींना सर्वाधिक गुण मिळाले असून या चौघींना देखील ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत.
तसेच विभागांनुसार देखील सीबीएसईने आपला निकाल जाहीर केला असून देशात तिरुवनंतपूरम विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागला आहे. तिरुवनंतपुरमध्ये सर्वाधिक ९९.६० टक्केविद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्याखालोखाल चेन्नई (९७.३७ टक्के) आणि अजमेर विभाग (९१.८६ टक्के) विभागाचा निकाल हा सर्वाधिक लागला आहे.
Powered By Sangraha 9.0