राज-उद्धव यांच्यासाठी कार्यकर्ता चढला उड्डाणपुलावर

27 May 2018 21:44:30



मुंबई ; मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी एक कार्यकर्ता जीवावर उदार झाला. श्याम गायकवाड असे या कार्यकर्त्याचे नाव असून, तो शिवसैनिक आहे. श्याम गायकवाड रविवारी दुपारच्या सुमारास दादरमधील खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरशेठ उड्डाणपुलाच्या मनोर्‍यावर चढला होता. श्याम गायकवाड आज दुपारच्या सुमारास दादरमधील खोदादाद सर्कल येथील जगन्नाथ शंकरसेठ उड्डाणपुलावर चढला. अचानक उड्डाणपुलावर कोणीतरी चढलंय हे पाहून, या ठिकाणी अनेक बघ्यांची गर्दी केली होती. सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून, श्याम उड्डाणपुलाच्या मनोर्‍यावर चढला व तेथून त्यानं आंदोलन सुरू केले. राज आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी त्याची मागणी आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर तासाभरानंतर सदर इसमाला खाली उतरवण्यात यश आले.

Powered By Sangraha 9.0