जिल्ह्यात तीन ग्रामपंचायातींसाठी येत्या २७ तारखेला मतदान

    दिनांक  25-May-2018
बुलढाणा : सिंदखेड राजा, मलकापूर आणि मोताळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी येत्या २७ मे ला जिल्ह्यात मतदान घेण्यात येणार आहे. या मतदाननंतर लगेच दुसऱ्या दिवशी या ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली आहे.

२७ तारखेला सकाळी ८ वाजल्यापासून या तिन्हीही ग्रामपंचायतींमध्ये मतदानाला सुरुवात होणार असून हे मतदान सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अर्थात २८ तारखेला सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरू करण्यात येणार आहे. यासाठी म्हणून सिंदखेड राजा तालुक्यात तहसिल कार्यालय, मलकापूर तालुक्याकरीता प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय मलकापूर व मोताळा तालुक्यासाठी तहसिल कार्यालयाचे जुने सभागृह मोताळा येथे स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. तीनही ठिकाणी मतमोजणी ९ वाजता सुरू होणार असून निवडणुकीसाठी उभे असलेल्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.