नक्षली भागात संपर्क वाढण्यासाठी सरकारचे सकारात्मक प्रयत्न

24 May 2018 10:25:48
 
 
 
 
 
छत्तीसगड : नक्षली भागांमध्ये विकास पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाला नसल्याने नागरिकांना या समस्यांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. संपर्क माध्यम देखील कमी असल्याने नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात राहणे कठीण जाते. आता या समस्येवर सरकार तोडगा काढत असून सरकारने मोबाईल संपर्क वाढण्यासाठी काही नव्या योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
 
 
छत्तीसगड, दंतेवाडा, सुकमा या नक्षली भागांमध्ये मोबाईल संपर्क वाढण्यासाठी सरकार येथे मोबाईल टॉवर तसेच इंटरनेट सुविधा पोहोचवण्याच्या योजना आखणार आहे. यामुळे नागरिकांना एकमेकांशी संपर्क करणे तसेच पोलिसांशी संपर्क करणे सोपे जाणार आहे. केंद्रीय सरकारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाला लवकरच मान्यता दिली जाईल असे म्हटले जात आहे. 
 
 
 
नक्षलवाद्यांमुळे पिडीत १० राज्यातील ९६ जिल्ह्यांमध्ये ४०७२ मोबाईल टॉवर उभारण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. ७३३० कोटी रुपये खर्च या योजनेला येणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये ४ जी आणि ब्रॉडबँडची सुविधा दिली जाईल. या सगळ्या मोबाईल टॉवरची सुविधा तेथील तैनात सुरक्षा रक्षक देखील घेवू शकतात असे सांगण्यात आले आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0