औरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे २४ मे रोजी आयोजन

    दिनांक  23-May-2018
 
 
 
 
 
औरंगाबाद : जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व नॅशनल करिअर सर्व्हिस औरंगाबाद यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. २४ मे २०१८ रोजी सकाळी १० वा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुष्पनगरी, बस स्टँड रोड, रिलायन्स पेट्रोल पंपाशेजारी, औरंगाबाद येथे करण्यात आले असल्याचे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
 
 
 
या रोजगार मेळाव्यासाठी विविध १५ कंपन्याचे अधिकारी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. यासाठी १० वी १२  वी पास, पदवीधर आयटीआय, डिप्लोमा, बी. फॉर्मसी, जनरल नर्सींग, बीएएमएस व बीएचएमएच इ. शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांच्या मुलाखती होऊन निवड हेणार आहे. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील एकूण ३९०  रिक्त जागासाठी मुलाखती घेण्यात येणार आहे यात कंपनीचे नाव उबेर प्रायव्हेट सर्व्हीसेस, कार चालक पद २० जागा, शैक्षणिक पात्रता १० वी पास व ड्रायव्हिंग लायसेन्स वय २०  ते ३५, कर्व्य डाटा मॅनेजमेंट सर्व्हिसेस लि. ट्रेनिंग कस्टमर सपोर्ट ऑफिसर पदाच्या १००  जागा, शैक्षणिक पात्रता १२  वी पास वय १०  ते ३५ , डिश टिव्ही सेल्स एक्सक्युटिव्हस ३०  जागा, शैक्षणिक पात्रता १०  वी पास वय १८ ते ३२, आयनॉक्स मल्टीप्लेक्स इलेक्ट्रीशियन, पदासाठी ५ जागा, ऑपरेशन एक्सक्युटिव्ह पदासाठी २०  जागा शैक्षणिक पात्रता १२  वी पास, वय १८ ते २५ , अजंठा मेडीयटर्स प्रा. लि. कॅनाट गार्डन सेक्युरेटी (सुरक्षा गार्ड ) पदासाठी २५  जागा शैक्षणिक पात्रता १०  वी पास व उंची १६०  वजन ५५ , वय २५  ते ३५  आहे.
 
 
 
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपल्या कागदपत्र व बायोडाटासह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी केले आहे.