स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान

21 May 2018 10:36:15
 
 
 
 
 
 
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राज्य विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. नाशिक, अमरावती, चंद्रपूर, रायगड-सिंधुदुर्ग-रत्नागिरी, उस्मानाबाद-लातूर-बीड आणि परभणी-हिंगोली या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक होणार आहे. 
 
 
 
उस्मानाबाद-लातूर-बीड मतदार संघासाठी लातूरमधून-३५३, उस्मानाबाद- २९१ आणि बीडमधून- ३६१ असे एकूण पाच हजार पाच मतदार तर परभणी-हिंगोली मतदार संघातून एकूण पाचशे तीन मतदार या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावतील. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत हे मतदान पार पडणार आहे. येत्या २४ तारखेला (गुरुवारी) मतमोजणी होणार आहे. 
 
 
 
दरम्यान, बीड नगर परिषदेतले आघाडीचे नऊ नगरसेवक आणि इतर दोन अशा एकूण अकरा नगर सेवकांचे मत पुढील सुनावणीपर्यंत ग्राह्य धरू नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. या अपात्र नगर सेवकांना निवडणूकीत मतदान करता येईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. मात्र आता पुढील सुनावणीशिवाय लातूर-उस्मानाबाद-बीड मतदार संघाचा निकाल जाहीर आकृ नका असे न्यायालयाने जाहीर केले आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0