बालकांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी सरकार राबविणार अभियान

21 May 2018 16:16:29
 
 
 
 
 
नवी दिल्ली : सध्या बालकांची तस्करी मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. त्यामुळे या कृत्यांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून बालकांची तस्करी रोखण्यासाठी एक अभियान चालवण्यात येणार आहे. हे अभियान भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून चालवण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यापासून हे अभियान सुरु करण्यात येणार असून रेल्वे स्थानकाजवळच्या भागात हे अभियान राबविले जाणार आहे. रेल्वेमध्ये एकटे मुलं अथवा अनोळखी ठिकाणी काही बालके आढळून आल्यास या अभियानाअंतर्गत त्या बालकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम या अभियानाअंतर्गत केले जाणार आहे. 
आठ जूनपासून हे अभियान सुरु होणार आहे. बालकांची तस्करी जास्ततर रेल्वे स्थानकांवर अथवा बस स्थानकांवर केली जाते. तसेच या बालकांना बस अथवा रेल्वेने इतर ठिकाणी नेले जाते त्यामुळे अशा बालकांचा शोध घ्यायचा असेल तर पहिले रेल्वे स्थानक पाहणे गरजेचे आहे. म्हणून प्रथम हे अभियान रेल्वे स्थानकावर राबविले जाणार आहे. 
बालकांच्या तस्करी रोखणे हे फार गरजेचे आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत चालला आहे. बालकांची तस्करी करून त्यांना इतर ठिकाणी विकून अथवा त्यांच्या अवयवांना विकून हे लोक पैसे कमवीत असतात. त्यामुळे सरकारने या समस्येला गांभीर्याने घेतले असून आता त्यासाठी अभियान सुरु केले जात आहे. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0