कर्नाटक रणसंग्राम : कुमारस्वामी २१ मे ऐवजी २३ मे रोजी घेणार शपथ

20 May 2018 13:08:14

 
 
 
बंगळुरू : कर्नाटक येथे अखेर रंजक राजकीय घडामोडींनंतर मुख्य़मंत्री पदासाठी जेडीएसचे प्रमुख नेते हर्दनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यांनी राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली असून ते बुधवार २३ मे २०१८ रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
 
 
 
 
राज्यपालांनी कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठण्यामध्ये जेडीएसला कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आता जनतेचा कल भाजपकडे असून देखील जेडीएस आणि काँग्रेसची युती होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.
 
राजीव गांधी पुण्यतिथीमुळे असल्या कारणाने शपथविधीच्या तारखांमध्ये बदल :
 
दरम्यान, कुमारस्वामी हे मुख्यमंत्री पदाची शपथ सोमवारी म्हणजेच २१ मे २०१८ रोजी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते, मात्र सोमवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी असल्याकारणाने शपथविधीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून आता ते बुधवार म्हणजेच २३ मे २०१८ रोजी शपथ ग्रहण करणार आहेत.
Powered By Sangraha 9.0