राहुल गांधींना भिवंडी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

02 May 2018 22:41:36

 

 
 
संघ अवमान प्रकरण
 

भिवंडी: महात्मा गांधी यांच्या हत्येचा बिनबुडाचा आरोप लावून रा. स्व. संघाचा अवमान केल्याप्रकरणी बुधवारी भिवंडी सत्र न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना १२ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. भिवंडी न्यायालयाचे न्यायाधीश ए. ए. शेख या प्रकरणात आरोप निश्चित करण्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा जबाब नोंदवू इच्छितात. त्यामुळे त्यांनी बुधवारी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राहुल गांधी न्यायालयात हजरच झाले नाहीत. त्यांच्या वकीलांनी न्यायालयात हजर राहण्यापासून सवलत मिळावी म्हणून अर्ज केला होता.

दि. १७ जानेवारीला भिवंडी न्यायालयाने राहुल गांधी यांना रा. स्व. संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी दाखल केलेल्या अवमान खटल्याप्रकरणी २३ एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. राजेश कुंटे यांनी राहुल गांधींविरोधात आरोप लावला होता की, त्यांनी संघावर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप लावला आहे. पण त्यांचा हा आरोप बिनबुडाचा असून त्यामुळे संघाचा अवमान झाला आहे, असे राजेश कुंटे यांचे म्हणणे आहे.

Powered By Sangraha 9.0