भाजपचे येदियुरप्पा आणि जनता दलाचे कुमारस्वामी आघाडीवर

15 May 2018 09:26:06

 
 
कर्नाटक निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. सर्वपक्षीय समर्थक निकालांकडे नजर रोखून बसलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांनी शिकारीपुरा मतदार संघातून मोठी आघाडी घेतलेली आहे.
 
 
त्याचबरोबर कर्नाटक निवडणुकांतील तिसरा महत्वाचा पक्ष जनता दल सेक्युलरचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे सुपुत्र एच. डी. कुमारस्वामी यांनी देखील रामनगर विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी घेतली आहे. जनता दल सेक्युलर पक्ष सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावू शकतो.
 
 
या सोबतच कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या मात्र चामुंडेश्वरी मतदार संघातून मात्र पिछाडीवर सुरु आहेत. काँग्रेस सहित अन्य समर्थकांसाठी ही चिंतेची बाब आहे. सध्या भाजप १०५ जागांवर आघाडीवर सुरु असून कॉंग्रेस ६३ जागी आणि जनता दल सेक्युलर ४२ जागांवर आघाडी घेत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0