केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल, राज्यवर्धन राठोड हे नवे माहिती आणि प्रसारण मंत्री

15 May 2018 09:35:45
 
 
 
 
 
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात आज मोठा फेरबदल करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून केंद्रीय क्रीडा मंत्री आणि कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यवर्धन राठोड हे नवे माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. 
 
 
 
त्यामुळे आता माहिती आणि प्रसारण मंत्री पदावरून स्मृती इराणी यांची पुन्हा एकदा उचलबांगडी करण्यात आली असून त्यामुळे आता स्मृती इराणी यांच्याकडे केवळ वस्त्रोद्योग हे खातेचं राहिले आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे किडनी प्रत्यारोपण झाले असल्याने त्यांचा काही भार कमी करण्यासाठी पियुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. 
 
 
याबरोबरच, केंद्रीय पाणी आणि स्वच्छता मंत्री एस.एस. अहलुवालिया यांच्याकडून सध्याचे पद काढण्यात आले असून त्यांना आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या सगळ्या फेरबदलात सगळ्यात मोठा धक्का स्मृती इराणी यांना बसला असून त्यांच्याकडे आता केवळ एकच पद राहिले आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0