भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे

15 May 2018 10:01:09

 
कर्नाटक निवडणुकीच्या निकालांनी भाजपच्या विजयाचे पूर्णपणे संकेत दिलेले आहेत. सध्या भाजप ११८ जागांवर आघाडीवर आहे, जे स्पष्ट बहुमताकडे जाणारे निकाल मानले जात आहेत. पहिल्यांदाच भाजपला कर्नाटकात एवढ्या जागा जिंकता येणार आहेत. त्या सोबतच सत्ताधारी कॉंग्रेसला मात्र ५७ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र समोर येत आहेत.
 
 
भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या बहुमतासोबतच कर्नाटकातील प्रादेशिक पक्ष जनता दल सेक्युलरने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. जनता दल सेक्युलरला ४४ जागांवर आघाडी मिळालेली आहे. मतमोजणीने त्रिशंकू विधानसभेच्या सर्व शक्यता खोडून काढल्या आहेत.
 
 
जनता दल सेक्युलरने काँग्रेस पक्षाचा मत शेअर मोठ्याप्रमाणात घेतला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच उर्वरित जागा काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरमध्ये विभागल्या गेल्या, त्याचा मोठ्याप्रमाणात फायदा भाजपला झाला आहे. त्याचबरोबर सत्तेत असल्यामुळे प्रतिकुलतेचा सामना कॉंग्रेसला मोठ्याप्रमाणात करायला मिळाला आहे. तसेच मोदी-शाह यांची रणनीती यशस्वी ठरताना दिसत आहे. भाजप पुन्हा एकदा कर्नाटकात सत्ता स्थापन करेल, त्याचबरोबर हे दक्षिण दिग्विजयाचे द्वार त्यांच्यासाठी खुले झाल्याची चर्चा सोशल मीडियात होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0