दिग्विजय सिंगांचे शिष्य

    दिनांक  15-May-2018   
 

 
 
 
''संघाचे लोक लग्न करत नाहीत म्हणून बलात्कार करतात,” असे अकलेचे तारे नुकतेच मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मानक अगरवाल यांनी तोडले. ज्यांची संघाचे कार्य, व्यक्तिनिर्माण, राष्ट्रभक्ती आणि ’परम वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्’ मागची भावना नेमकी काय, हे समजून घेण्याची लायकी नाही, ते लोक नेहमीच संघ आणि संघ स्वयंसेवकांबद्दल बरळत असतात. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि आपल्या ’टंच माल’ सारख्या थिल्लर विधानांमुळे अहोरात्र प्रसिद्धी की कुप्रसिद्धीच्या झोतात आलेल्या दिग्विजय सिंगांची अशा लोकांत गणना होते. योगायोगाने मानक अगरवालही दिग्विजय सिंगांचे जवळचे सखे-सोबती आहेत. त्यामुळेच दिग्विजय सिंगांच्या संगतीचा गुण त्यांनाही लागला. आता गुण नुसताच लागून उपयोग नाही, तर तो गुण लागल्याचे जगाच्या वेशीवर जाऊन सगळ्यांना सांगायलाही हवे ना. मानक अगरवाल यांनी तेच केले आणि आपल्या तोंडून संघद्वेषाची गटारगंगा वाहती केली.
 
 
देशातला संघ आणि भाजपचा कट्टर विरोधकही पूर्णपणे शुद्धीवर असेल तर अशा प्रकारचे अभद्र विधान करू शकत नाही. ज्यांची शुद्धच हरपली आहे, ते लोक नक्कीच अशी विधाने करू शकतात. मानक अगरवाल यांचीही शुद्ध हरपली असावी. आता त्यांनी आपली वैद्यकीय तपासणी करून हरपलेली शुद्ध जागेवर आणावी. दुसरीकडे मानक अगरवाल यांच्या या विधानावर अजूनही काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ, मध्य प्रदेश काँग्रेसचे बडे नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि मानक अगरवाल यांचे गुरू दिग्विजय सिंग यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही वा निषेधही केलेला नाही. काँग्रेसी संस्कृती आणि नैतिकतेच्या बाता मारणार्‍या या नेत्यांनी मानक अगरवाल यांच्या वक्तव्याचा साधा निषेध करण्याचीही हिम्मत दाखवलेली नाही. म्हणजेच, या सर्वांचेही मानक अगरवाल यांच्या संघ व स्वयंसेवकांबद्दलच्या हलकट विधानाला समर्थन असल्याचे समजायला हवे. तसे असेल तर मानक अगरवाल यांच्या या विधानामुळे राहुल गांधीही गोत्यातच येणार आहेत, कारण राहुल गांधीही अविवाहितच आहेत आणि लग्न न झालेले पुरुष बलात्कार करतात, असा मानक अगरवाल यांचा दावा आहे. मानक अगरवाल आता राहुल गांधींविषयीही असेच बोलणार का? 
 
 
हीच ती काँग्रेसी संस्कृती!
 
 
ज्या लोकांची उभी हयात हाती कटोरे घेऊन गांधी परिवाराने फेकलेले तुकडे झेलण्यात गेली, ते लोक अशी पराकोटीची, धादांत अर्थहीन अशी विधाने सतत करत असतात. अशा लोकांना गांधी परिवार आणि काँग्रेस पक्षाव्यतिरिक्त जगात कोणी सुसंस्कृत असल्याचा विचारच करवत नाही. म्हणून आपल्या पक्षाच्या लोकांनी नेमकी कोणती कृष्णकृत्ये केलीत, हे त्यांना कधी दिसतच नाही. मानक अगरवाल हे त्यापैकीच एक. इथे मानक अगरवाल यांना काही गोष्टींची आठवण नक्कीच करून दिली पाहिजे. मानक अगरवाल ज्या काँग्रेसी संस्कृतीत रमले, त्यांना मानवी जीवनाच्या पावित्र्याची माहिती असूच शकत नाही. कारण, याच काँग्रेसी संस्कृतीने नेहमीच स्त्रीला भोग्य मानले, याची कित्येक उदाहरणे देता येतील.
 
 
सुकन्या देवी या अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्याच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला होता. २००६ सालची ही घटना असल्याचे सांगितले जाते. सुकन्या देवी आणि तिच्या आईने राहुल गांधींच्या या कृत्याची तक्रार अगदी सोनिया गांधींपासून तत्कालीन राष्ट्रपतींपर्यंतही केली. पण त्यानंतर काय झाले कोणास ठाऊक, सुकन्या देवी आणि तिची आई एकाएकी गायब झाले. त्या दोघी आजपर्यंत सापडलेल्या नाहीत. १९८३ सालच्या नागपूरमधील युवक काँग्रेसच्या अधिवेशनानंतर काँग्रेसी गुंडांनी रस्त्यावर केलेला नंगानाच कोणाला आठवतोय का? काँग्रेसींच्या या असल्या आंबट चाळ्यांमुळे तेव्हा नागपूरमधील वेश्यांवरही पोलीस संरक्षण मागण्याची वेळ ओढवली होती. दिल्लीच्या सुशील शर्मा नामक काँग्रेस नेत्याने तर आपली पत्नी नयना साहनी हिला अशोका यात्री निवासच्या तंदूरमध्ये तुकडे तुकडे करून जाळले होते. केरळ काँग्रेसचे नेते एम. विन्सेंट, आसाममधील काँग्रेस नेते बिक्रम सिंह ब्रह्मा हेदेखील बलात्कारप्रकरणात अडकले होते. ही काँग्रेसची संस्कृती आहे, हा काँग्रेसचा विचार आहे. मानक अगरवाल याच काँग्रेसी संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे जसे वराहाला जिथे पाहावे तिथे घाणच घाण दिसते, तसे मानक अगरवालसारख्यांना संपूर्ण जग आपल्यासारखेच घाणेरडे असल्याचे दिसते आणि ते तोच विचार डोक्यात ठेऊन वागतात, बोलतात.  
 
 
-महेश पुराणिक