सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री, पेट्रोल आणि डीझेल महागलं

14 May 2018 16:15:26
 
 
 
 
 
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्याबरोबरच लगेच तेल कंपन्यांनी तेलाच्या किंमती वाढविल्या असून पेट्रोल १७ पैश्यांनी तर डीझेल २१ पैश्यांनी महाग झाले आहे. काल कर्नाटक विधानसभा निवडणुकासाठी मतदान झाले आणि आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे सामन्य नागरिकांच्या खिश्याला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. 
 
 
 
रोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत होत्या मात्र कर्नाटक विधानसभा निवडणुका असल्याने इतके दिवस तेलाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी तेल कंपन्या हळूहळू आपल्या किंमती वाढवतील आणि आपले नुकसान यातून भरून काढतील अशी माहिती पुढे आली आहे. 
 
 
 
आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस तेलाच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे भारत सरकारला देखील तेलासाठी खूप किंमत मोजावी लागत आहे. आता इतके दिवस कर्नाटक विधानसभेच्या मतदानासाठी ज्या किंमती थांबवून ठेवल्या होत्या आता त्याच किंमती वाढवण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यात त्यांच्या मूळ किंमतीनुसार तेल महागणार आहे. या किंमतीचा सगळ्यात जास्त फटका दिल्लीला बसणार आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0