इंडोनेशिया येथे आत्मघातकी हल्ले, ६ ठार

    दिनांक  13-May-2018

 
 
जकार्ता : पूर्व इंडोनेशियाच्या राजधानीत म्हणजेच सुराब्या येथील ३ चर्चमध्ये आत्मघाती हल्ले झाले आहेत. या बॉम्बस्फोट ६ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या महितीनुसार ३५ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
 
 
 
हाती आलेल्या माहितीनुसार पहिला स्फोट सांता मारिया चर्चमध्ये सकाळी ७.३० वाजता झाला. त्यानंतर गेरजा क्रिस्टन चर्च आणि पेंटाकोस्टा चर्चमध्ये तिसरा हा स्फोट झाला.
हा स्फोट सुसाईड बॉम्बर्सने घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी सकाळी चर्चमध्ये धार्मिक विधी करत असलेल्या लोकांमध्ये जावून हा स्फोट करण्यात आला. पोलिसांनी तेथे सुरक्षेच्या दृष्टीने जाण्या-येण्यास बंदी घातली असून, या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.