कैर्‍या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाचा खून

11 May 2018 11:54:12
 
 
 
कैर्‍या तोडल्या म्हणून अल्पवयीन मुलाचा खून
नंदुरबार, ११ मे
आंब्याच्या झाडाच्या ६ कैर्‍या तोडल्याने १२ वर्षी मुलाचा झाडाच्या सालीने गळाफास लावून खून केल्या प्रकरणी गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
 
अजय रमेश ठाकरे वय १२ रा.पिंपळाबारी माथेपाडा ता.धडगाव हा ४ मे रोजी कैर्‍या तोडण्यास गेला होता. संशयीत आरोपी कुंदन निंज्या वळवी रा.पिंपळाबारी ता.धडगाव याने अजय ठाकरे यास कैर्‍या तोडतांना पाहिले व अजय याने सुध्दा कुंदन वळवी यांना पाहिले होते. तद नंतर कुंदन वळवी हा ६ कैर्‍या व अजय ठाकरे याची चप्पल घेसून अजय ठाकरे याच्या वडील रमेश ठाकरे यांच्याकडे आला. तुमचा मुलगा कैर्‍या तोडत होता. मी त्याला पाहिले आणि तो पळून गेला. म्हणून त्याने तोडलेल्या ६ कैर्‍या व चप्पल त्याच्या वडीलांकडे दिली.
 
 
४ तारखेपासून अजय हा गायब होता. त्याच्या नातेवाईकांकडे त्याचे पालक त्याची चौकशी करत होते. परंतु ७ रोजी पिंपळाबारी गावाचे शिवारात वन विभागाचे कुप. क्र. ३७६ चे पातारी डोंगरावर अजय ठकारे याचा मृतदेह आढळला. याबाबत पोलिसांनी अकास्मात मृत्यू नोंद केलेला होता.
 
 
रमेश जाण्या ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन १० रोजी दुपारी कुंदन निंज्या वळवी याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. भामरे करत आहे.
 
घटनेची माहिती मिळल्या नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी एम.बी.पाटील, पो.नि.एस.बी.भामरे यांनी घटनस्थळी जावून पाहणी केली होती.
 
Powered By Sangraha 9.0