१५ व्या आशिया मीडिया शिखर संमेलनाची आजपासून सुरुवात

10 May 2018 10:41:05
 
 

 
 
 
नवी दिल्ली : आज नवी दिल्ली येथे १५ व्या आशिया मीडिया शिखर संमेलनाला सुरुवात होणार आहे. केंद्रीय वस्त्र व माहिती, प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या भाषणाने आज या संमेलनाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसीय या संमेलनात ३९ देशांचे २२८ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या संमेलनात आशियातील मीडियासंबधी लोक येणार असून या संमेलनात हे सगळे विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. 
 
 
 
 
 
 
 
आज आपल्याकडे व्यक्त होण्यासाठी मीडिया हे एक सशक्त माध्यम आहे. याचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. सोशल मीडियावरून आज संपूर्ण जग व्यक्त होत आहे मात्र हे करीत असतांना आपण सामाजिक भान विसरतो अशी माहिती यावेळी स्मृती इराणी यांनी दिली. यावर चर्चा करण्यासाठी आज या संमेलनाची सुरुवात करण्यात आली असून यामुळे संपूर्ण आशियातील मीडियाचे काय विचार आहेत याची जाणीव आणि कल्पना इतर देशांना येईल आणि यामुळे चुकीच्या बाबी टाळता येतील असे त्या यावेळी म्हणाल्या. 
 
Powered By Sangraha 9.0